
सिन्नर( प्रतिनिधी )महामित्र परिवार,आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड वतीने सिन्नर येथिल शिवाजी चौक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले*.यावेळी शहिदांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.या कार्याक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारक शहिद झाले त्या पैकी शहिद भगतसिंग राजगुरू सुखदेव हे होत. इंग्रजांनी जालियनवाला बाग हत्याकांड केले. लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेला मृत्यु ह्यामुळे त्यांना मारणाऱ्या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्सला उडविण्यात आले.डाॅ.आर.टी.जाधव यांनी मनोगत व्यक्त केले तसेच, ‘पब्लिक सेफ्टी’ बिला विरूध्द देशभर संताप व्यक्त होत होता या बिलावर सेंट्रल असेंब्लीत चर्चा चालू असताना बटूकेश्वर दत्त आणि भगतसिंग यांनी असेंब्लित बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. व त्यांनी स्वत : हून अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे मांडली परंतु कोर्टाने त्यांना दोषी ठरवून भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च १९३१ला ‘ इन्कलाब झिंदाबाद ‘ च्या घोषणा देत ते तिघेही हसत हसत फासावर चढले. विजय मुठे यांनी असे मनोगत व्यक्त केले.देशासाठी भगतसिंगांनी २३ व्या वर्षी आपले बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ २३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. अमोल गवारी यांनी मनोगत व्यक्त केले ह्या शाहिद दिनानिमीत्त प्रत्येक स्तरावर शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन केले पाहिजे असे नवशीराम साबळे म्हणाले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय मुठे प्रास्थाविक विजय मुठे तर आभार अमोल गवारी यांनी मानले. यावेळी महामित्र दत्ता वायचळे,डाॅ.आर.टी.जाधव, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,ट्रायबल आमीॅ अध्यक्ष अमोल गवारी,धनंजय जाधव, विश्वास बुरुकुले,नवशीराम साबळे,राजेंद्र लांखडे,सुभाष आव्हाड, लक्ष्मण बोडके,राजेंद्र देशमुख प्रकाश माळी,शिवाजी सातपुते,विजय सुवे॔,गोपीनाथ वाजे,राजेंद्र सातपुते,गोंविद मोरे,सिताराम घुमरे,नामदेव कुटे,विलास दराडे,चंद्रकांत झगडे,मनोज माळी आदि.उपस्थित होते.
