
नांदगाव ( प्रतिनिधी)नमन एज्युकेशन संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची’गुड बाय पार्टी ‘उत्साहात संपन्न झाली दि. 22 मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय बागूल सर व उपाध्यक्ष सौ.सरिता बागूल मॅम यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

.मा.मॅनेजमेंटच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानेकरण्यात आली.नंतर सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करून त्यांनी पण सरस्वती पूजन केले. विद्यार्थी स्थानापन्न झाल्यावर सर्व वर्ग शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली. रेनबो स्कूल इ.पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक अनुभव सांगितले. इ.तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा सुरेख डान्स झाला.विद्यार्थ्यांची लंच पार्टी नंतर ‘द जंगल बूक’ हा मुव्ही दाखविण्यासाठी स्पेशल तिकिट काऊंटर करण्यात आले होते.

तिकिट घेऊन सर्वानी मुव्ही खूप एन्जॉय केला. शेवटी डान्स करून मा.मॅनेजमेंटच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना आईसक्रीम देण्यात आले. मा.मॅनेजमेंटने जागृत शिक्षण प्रणालीविषयी विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमकुम मिस वस्वप्नाली मिस यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पारपाझाली.डण्यासाठी शालेय शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय मेहनत घेतली.

