
महाळुंगे पडवळ ( प्रतिनिधी ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कलाविष्कार २०२५हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा झाला . . येथील प्राथमिक शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात .यावर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांनी अनेक नृत्यप्रकार ‘ थीम सॉंग ‘ नाटिका सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली . विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्य पाहून पालक वर्गाने मुलांचे कौतुक केले .

याप्रसंगी शरद सहकारी बँकेचे संचालक श्री किसन सैद ‘ सेवानिवृत्त प्राचार्य के जे आवटे सर जयश्रीताई दहिदुले ‘श्री दत्त पतसंस्थेचे चेअरमन श्री सुनील शेठ वाळुंज ‘ व्हाईस चेअरमन श्रध्दा पडवळ उपसरपंच विकास पडवळ , प्रसिद्ध गाडा मालक अक्षय शेठ सोलाट ‘ राजू शेठ आवटे ,बाबाजी चासकर , ग्रामपंचायत सदस्या अलका पडवळ , शितल आवटे ‘उदय आंबटकर ‘तान्हाजी चासकर गुरुजी भालचंद्र पडवळ ‘ रोहिणी पडवळ ‘ वैशाली डोके तसेच जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी किंगफा सायन्स अँड टेक्नॉलॉजी वासुली या कंपनीमार्फत सामाजिक दायित्व निधीतून शाळेस बारा संगणक ‘लॅपटॉप दिल्याबद्दल कंपनीचे व्यवस्थापक श्री सचिन शेठ पानमंद यांचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश आवटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका विजया बोऱ्हाडे ‘शारदा सोनवणे , आत्माराम जगदाळे ‘ रामदास सैद ‘ अपर्णा सिनलकर ‘संगीता मुंजावडे ‘कविता हुले ‘ घेवरचंद भाईक श्रद्धा डोके यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सतीश जाधव यांनी केले व सूत्रसंचालन सुनिता आंबटकर यांनी केले .
