
आजकाल महिलांमध्ये पुरुषांप्रमाणेच क्रूरता वाढत आहे.आपल्याच पतीची अमानुषपणे हत्या करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस विवाहित महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मेरठ मध्ये एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घुण पणे हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते सिमेंट मध्ये विसरून ड्रम मध्ये टाकले हे प्रकरण नुकतेच उघडकीस आले असतानाच जयपुर मधून असेच आणखीन एक प्रकरण समोर आले आहे महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने तिच्या पतीची हत्या केली नंतर त्याचा मृतदेह एका पोत्यात भरून आग लावली या संबंधित घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. तिसऱ्या एका प्रकरणांमध्ये प्रेमात अडचण ठरलेल्या पतीच्या पत्नीने काटा काढला ही घटना मुंबईतील दिंडोशी भागात घडली.वरील तिन्ही प्रकरणांमध्ये विवाहित महिलांनी आपल्या पतीची निघृणपणे हत्या केली.इतकं अमानवीय कृत्य कोणी कसं करू शकतं? लोक इतकी क्रूर का होतात? वैवाहिक संबंधातून घडलेल्या घटनांकडे पाहताना, ज्या व्यक्तीबरोबर आपण राहत आलोय, संसार थाटलाय त्याच्याप्रति इतकी घृणा, सुडाची भावना कशी उत्पन्न होऊ शकते. असे एक ना अनेक प्रश्नांचं वादळ मनात उठत राहतं.महिला पराकोटीच्या क्रूर असू शकतात अशा कल्पनेनेच सामान्यांना धक्का बसतो. पण का? महिलांनी केलेला हिंसाचार किंवा क्रूरता पुरुषांनी केलेल्या क्रूरतेपेक्षा वेगळी असते का? वेगळी असली काय किंवा नसली काय, हाती आलेल्या पुराव्यांवरून हेच सिद्ध होतं की एक समाज म्हणून आपण महिला आणि पुरुष गुन्हेगारांना समान वागणूक देत नाही.आजही जवळपास ८० टक्क्यांहून जास्त हिंसाचार, क्रूरता आणि हत्या पुरुषांकडून होतात. जर घरगुती हिंसाचाराची गोष्ट केली तर त्यातही सर्वाधिक आरोपी पुरुषच असतात, पण पुरुषांकडून असं वागण्याची कदाचित समाजाला सवय असते, त्यामुळे त्यांनी केलेल्या गुन्ह्यांमुळे धक्का बसत नाही.याउलट महिलांनी केलेले गुन्हे, हिंसाचाराकडे समाज, माध्यमं आणि न्यायव्यवस्था वेगळ्या दृष्टीने पाहातात आणि त्यातून महिला गुन्हेगारांना त्यांच्या पुरुष समकक्षांपेक्षा वेगळी वागणूक मिळते. पण त्याआधी आपण हे समजायला हवं की महिला गुन्हेगारांच्या मनात, विशेषतः खूनासारखे क्रूर गुन्हे करणाऱ्या महिलांच्या डोक्यात काय सुरू असतं?महिलांमध्ये क्रूरता येण्यामागे अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक कारणं असू शकतात. काहीवेळा, हे लैंगिक असमानता, हिंसा आणि अन्याय यांसारख्या समस्यांमुळे घडते, तर काहीवेळा, मानसिक समस्या किंवा वाईट अनुभवामुळे देखील क्रूरता येऊ शकते. फ्रेंच तत्त्ववेत्ता अल्बर्ट कामू म्हणतो की ‘कोणताही गुन्हा गुन्हाच असतो. मात्र, गुन्ह्याची तीव्रता वाढली की समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.’चोरी, दरोडे किंवा प्राणघातक हल्ल्यांसारख्या गुन्ह्यांकडे समाज फारसं लक्ष देत नाही. घटना घडतात, त्यावर चर्चा होते आणि कालांतराने त्यांचा सहज विसर पडत जातो. परंतु, हत्येसारखे गुन्हे स्मृतीतून सहजपणे काढून टाकता येत नाही.आर्थिक संबंधातील ताण, मानवी नात्यातील संघर्षामुळे समाजात गुन्हे घडतात, खून होतात. अनियंत्रित राग किंवा क्षणिक संताप बरेचदा खुनाचे कारण बनते, तर कुठे प्रतिस्पर्धा, हेवेदावे, सूडभावना, कौटुंबिक कलह मोठ्या घटनेचे कारण ठरतात.पुरुषांपेक्षा स्त्रिया या जास्त प्रेमळ असतात..त्यांना आपुलकी असते.काळजी करणारी असते आणि इजा करणं किंवा हत्या करणं हे तिच्या मुळ प्रकृतीच्या विरोधात असतं.स्त्रीच्या मेंदूत असा काही भाग असतो का जो तिला हिंसा करण्यापासून रोखतो? कोणती संप्रेरकं किंवा जनुकं असतात का जी स्त्रीला आक्रमक होऊ देत नाही? आणि मग ज्या स्त्रिया हिंसा करतात त्या इतर महिलांपेक्षा वेगळ्या असतात का?पुरुष आणि स्त्रीचा मेंदू हिंसेच्या बाबतीत वेगवेगळा काम करतो असं लोकांना वाटत असलं तरी नव्या संशोधनातले निष्कर्ष त्याच्या उलट आहेत.जिना रिपन या मानवी स्वभावावर अभ्यास करतात. त्या अॅस्टन विद्यापीठात लिहिलेल्या आपल्या शोधनिबंधात म्हणतात, “मेंदूची पुरुषी आणि बायकी असे भाग करणं चुकीचं आहे. काही गोष्ट या बायकी समजल्या जातात, जसं की हळूवारपणा, प्रेमळपणा तर काही गोष्टी पुरुषी समजल्या जातात जसं की आक्रमकता. पण बायकी-पुरुषी असं काही नसतं. हे दोन्हीकडे आढळतात.”स्त्रीची ओळख ही आईपणाच्या व्याख्येत केली जाते. अनेक महिलांची पहिली ओळख ही आई म्हणूनच केली जाते आणि म्हणून आई या भूमिकेची चिकित्सा करणं अवघड असतं असं क्लीनिकल सायकोलॉजिस्ट अॅना मॉत्झ यांना वाटतं.९५६१५९४३०६
