
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८५४ वा दिवस केवळ पोकळ गप्पांमध्ये शक्तीचा अपव्यय करण्याऐवजी तुम्ही एखादा प्रत्यक्ष उपाय शोधून काढला आहे काय? आपल्या देशातील अज्ञानी, उपेक्षित, पिडीत, दरिद्री लोक जिवंतपणी ज्या यमयातना भोगीत आहेत, त्या यातना हलक्या करण्यासाठी सांत्वनाचे चार गोड शब्द तुम्ही त्यांच्याशी बोलता काय? की केवळ त्यांच्यावर टीका टिप्पणी करता? जर तुम्ही मधुर, प्रेमाचे गोड शब्द त्यांच्याशी बोलत असाल तर ती दुसरी पायरी झाली. तुम्ही करत असलेले सत्कर्म पैसा कीर्ती किंवा सत्ता यांच्या लालसेपोटी नाही, याविषयी तुमची पूर्णपणे खात्री आहे ना? कोणत्याही कर्मात आपला हेतू शुद्ध पाहिजे. निरपेक्ष असला पाहिजे.
स्वामी विवेकानंद. ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
*★ भारतीय सौर २ चैत्र शके १९४७*
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ९
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ रविवार दि. २३ मार्च २०२५ ★ १९१० समाजवादी नेते, विख्यात संसदपटू राम मनोहर लोहिया यांचा जन्मदिन
★ १९३१ क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरु या तिघांना लाहोरच्या तुरुंगात रात्री साडेसात वाजता फाशी देण्यात आली. हुतात्म्यांचे पुण्यस्मरण.वीर हुतात्म्यांना श्रध्दांजली….
★ २००७ मराठी साहित्यीक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा स्मृतीदिन
★ शहीद दिन★ जागतिक हवामान दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
