
गांधी रिसर्च फौंडेशन जळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करताना मुख्याध्यापिका संगीता सागर, पर्यवेक्षक आर.एच. देसले समवेत शिक्षकवृंद.(छाया-:सुनिल एखंडे)
लोहोणेर-:( प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाने गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. विद्यालयाची विद्यार्थिनी खुशी दिलीप बोरसे हिने नाशिक जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून सिल्वर मेडल प्राप्त केले. परीक्षेसाठी विद्यालयातील पाचवी ते दहावीचे एकूण १४९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.यावेळी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संगीता सागर होत्या तर पर्यवेक्षक आर.एच.देसले यांच्यासह शिक्षकवृंद व्यासपीठावरती उपस्थित होते.प्रास्ताविकातून छोटू वाघ यांनी या परीक्षेचे महत्व ती घेण्यामागचा उद्देश समजावून सांगितला. दरवर्षी जळगाव फाउंडेशन यांच्यावतीने ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर घेण्यात येते.सदर परीक्षेसाठी समन्वयक म्हणून रोहित पाटील यांनी काम पाहिले तर अलका सूर्यवंशी, सलीम शहा, विश्वास जाधव यांनी सहकार्य केले.परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंदांचे मोलाचे सहकार्य केले.सूत्रसंचालन छोटू वाघ यांनी केले.
