
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात जागतिक जल दिन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सेवक वृंद
कसबे सुकेणे (प्रतिनिधी) ता 22- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक जल दिन प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक अनिल परदेशी होते यावेळी प्रास्ताविकातून भारत मोगल यांनी जागतिक जल दिनाचे महत्त्व विशद केले विद्यार्थिनी अदिती गायकवाड व संगीत शिक्षक श्री रामेश्वर धोंगडे यांनी जागतिक जल दिनाविषयी उपस्थितांना माहिती करून दिली अध्यक्षीय मनोगतातून उपमुख्याध्यापक परदेशी यांनी जागतिक जल दिन साजरा करण्यामागचा हेतू विशद केला कार्यक्रमासाठी अभिनव मुख्याध्यापक राहुल मोगल दत्तू पडोळ आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार क्रीडा शिक्षक बाळासाहेब गडाख यांनी मानले फलक लेखन कलाशिक्षिका श्रीम आरती मोरे यांनी केले
