
मखमलाबाद विद्यालयात जागतिक जल दिन साजरा करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपमुख्याध्यापिका विमल रायते.पर्यवेक्षक सुनील पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे २२ मार्च हा जागतिक जल दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य संजय डेर्ले यांनी भूषविले. त्यांच्या समवेत उपमुख्याध्यापिका विमल रायते व पर्यवेक्षक सुनिल पाटील उपस्थित होते.* *शिक्षक मनोगतात दिपाली कोल्हे यांनी जागतिक जल दिन का साजरा केला जातो याचे सविस्तर विवेचन केले. “पाणी म्हणजे जीवन”.,”स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचा काळजी घेणे व त्यांच्या शाश्वत संरक्षणासाठी कार्यरत राहणे हा संदेश देण्याचा हा दिवस आहे. जलसंकटाचा सामना करण्यासाठी कृती करण्यास प्रेरणा देणारा हा दिवस.” पाण्याची भूजल पातळीत वाढ होण्यासाठी झाडे लावा ते कापू नका असा संदेश देत जल दिनी पाण्याचे महत्त्व,योग्य वापर तसेच जल व्यवस्थापन होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

पाण्याचे महत्त्व विषद करण्यासाठी इ.९वी अ च्या विद्यार्थ्यांनी विविध पोस्ट्स व इ.५वी ड च्या विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य तयार करून सर्व मुलांसमोर स्टेजवर सादर केले.शेवटी कु.तनुश्री लोखंडे इ.८वी अ हीने सर्व विद्यार्थी व शिक्षकांकडून जलप्रतिज्ञा वदून घेतली. कल्पना देशमाने यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

