
सीपीएस ऑलिंपियाड या आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे प्रदान करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपमुख्याध्यापिका विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील,मार्गदर्शक शिक्षिका योगिता कासार,योगिता रोडे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथील विद्यार्थ्यांनी सीपीएस ऑलिंपियाड या आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत गोल्ड,सिल्व्हर तसेच ब्रान्झ मेडल मिळवून घवघवीत यश संपादन केले. इ.५वी ते १०वी तील तब्बल २०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेत सहभाग नोंदवला होता.त्या पैकी 30 विद्यार्थ्यांनी गोल्ड,सिल्व्हर तसेच ब्रान्झ मेडल प्राप्त केलेले आहेत. त्यापैकी ९ विद्यार्थ्यांचे 2nd Level साठी सिलेक्शन झाले आहे.या विद्यार्थ्यांना योगिता कासार व योगिता रोडे या शिक्षकांकडून बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे,मविप्र अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,संचालक रमेश आबा पिंगळे,माजी सेवक संचालक डॉ.अशोकराव पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ.भास्करराव ढोके,अभिनव शालेय समिती अध्यक्ष निवृत्ती महाले,उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष पंडितराव पिंगळे,कला व वाणिज्य महाविद्यालय समिती अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन शालेय समिती अध्यक्ष शंकरराव पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड,शालेय समिती सदस्य, मविप्र सभासद,ग्रामस्थ,प्राचार्य संजय डेर्ले,उपमुख्याध्यापिका विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील,सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले

