
-**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०४६ वा दिवस* एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पवित्र आणि नीतिमान जीवन जगल्यामुळे प्राप्त होणारे अद्भुत सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. अशी शांत वृत्ती, असे समाधान, असे प्रेम, अबोल आणि अविरत कार्यमग्नता, आणि ज्यावेळी कृती आवश्यक असेल त्यावेळी सिंहसदृश सामर्थ्यांचे प्रकटीकरण – हे सगळे तुम्हाला आणखी कोठे आढळणार आहे बरे? हे पहा, तुमचे वारसदार तुमच्या समोर उभे आहेत; भावी भारतवर्ष तुमच्यासमोर उभा आहे. काढा तुमची ती मणिरत्न भांडारे, काढा हिरे जडविलेल्या आंगठ्या. हे सारे देऊन तुम्ही जगातून नाहीसे व्हा, तुम्ही अदृश्य होता न होता तोच नव भारताच्या जागृतीची पहिली ललकारी तुम्हाला ऐकू येईल. सगळ्या जगाला दणाणून सोडीत लक्ष लक्ष कंठातून ललकारी उठेल “वाह गुरु की फतेह!” – गुरूचा जयजयकार असो! *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १० अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन शुक्ल /शुध्द १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ ★ विजया दशमी, ‘दसरा’ सिमोलंघन
★ शस्त्रपूजन, अश्वपूजन, शमीपूजन
★ १८६९ जगाला सत्य, अहिंसा, सदाचाराचा संदेश देणारे, अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी (बापूजी) यांची जयंती.
★ १९०४ जय जवान जय किसानचा क्रांतिकारी नारा देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती.
★ १९७५ स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेस नेते, खासदार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामकाज यांचा स्मृतिदिन.
★ जागतिक अहिंसा दिन
★ स्वच्छता दिन.
★ बापूजींच्या व शास्त्रीजींच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन.
★ प्रभु रामचंद्रांचा आदर्श घेऊन, रावणरूपी अहंकाराचा नाश करत, आपण सारे मिळून सिमोलंघन करूया. विजयादशमीच्या आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय हार्दिक शुभेच्छा.
