
नाशिक:- (प्रतिनिधी )’राजीव बर्वे यांची कविता… स्वरूप आणि आकलन’ (डॉ.श्रीपाल सबनीस) आणि दिलीपराज प्रकाशनाचे ३०००वे पुस्तक ‘मनातील पत्रे…’ (राजीव बर्वे) या दोन ग्रंथांच्या प्रकाशनानिमित्त रविवार (दि.५) रोजी निमंत्रित कवींची “काव्यसंध्या” रंगणार आहे. सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या काव्यसंध्येत ज्येष्ठ साहित्यिक तुकाराम तुळसाबाई सीताराम ढिकले, जयश्री कलावती अनिल वाघ, रतन कुसुमबाई सीताराम पिंगट, मुकुंद अनुसया निवृत्ती ताकाटे, राजेंद्र विमल बाळासाहेब सोमवंशी हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन कवी राजेंद्र दगुबाई बापूराव उगले करणार आहेत. साहित्यिक आणि रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाचे प्रणेते विनायक रानडे, रेडिओ विश्वासच्या समन्वयक ऋचिता ठाकूर, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार, उपाध्यक्ष वसंतराव खैरनार आदींनी केले आहे.
