
नायगाव (प्रतिनिधी)–मविप्र संचलित नायगाव येथील जनता विद्यालयात मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला शालेय समिती अध्यक्ष अशोकराव लोहकरे, माजी सरपंच समाधान कदम, शालेय समिती सदस्य काशिनाथ लोहकरे, विजय गायकवाड आणि प्राचार्य बी.इ. कलकत्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती मायावती गावित यांचा देखील सन्मान करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांनी तसेच श्री कलकत्ते सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असे उपक्रम गरजेचे असल्याचे सांगितले.फोटो ::- नायगाव येथील जनता विद्यालयात चित्रकला स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करताना उपस्थित मान्यवर….

