
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८५३ वा दिवस बुध्दीची आवश्यकता आहेच ती नसेल तर आपण चुका करू, धडपडू, ठेचाळू पण चुका टाळणे यापलीकडे बुध्दीचे काही विशेष काम आहे असे समजू नका. बुध्दीचे स्थान दुय्यम आहे, खरे काम भावनेचेच आहे. हृदयाचेच आहे. शुद्ध प्रेमाने साध्य होत नाही असे जगात दुसरे आहे काय? विश्वातील सारी रहस्ये उलगडणारी गुरुकिल्ली प्रेमात आहे. म्हणून सुधारणा करण्याची आकांक्षा धरणार्या माझ्या देशप्रेमी मित्रांनो! आधी निरपेक्ष प्रेम करायला शिका. देवदेवता आणि ज्ञानी ऋषी यांची ही लक्षावधी मुले अक्षरशः पशुतुल्य जीवन जगत आहेत हे पाहून तुमच्या काळजाला वेदना होतात का? विपन्नता, अज्ञान, दारिद्र्य यांच्या गर्तेत असणाऱ्या आपल्या लक्षावधी बांधवांसाठी आपले काळीज तुटते का? स्वामी विवेकानंद.. *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १ चैत्र शके १९४७*
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ८
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ शनिवार दि. २२ मार्च २०२५ ★ १९८४ लेखक आणि पत्रकार प्रभाकर पाध्ये यांचा स्मृतीदिन
★ २००४ कायदेपंडित आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक जल दिन.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*


