
**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०४५ वा दिवस* मनुष्य व पशू यांच्यातील भेद प्रमुख आहे, मनुष्याच्या ठिकाणी एकाग्रतेची शक्ती पशूहून अधिक असते. आपण आपल्या इच्छेनुसार आपली मने वस्तूंवर केंद्रित केली पाहिजेत; वस्तूंनी आपली मने त्यांच्याकडे ओढू नयेत. सामान्यतः आपल्याला मन केंद्रित करणे भाग पडते. वस्तूतील ज्या आकर्षणाचा आपण प्रतिकार करू शकत नाही त्या आकर्षणामुळे आपली मने त्या वस्तूंवर केंद्रित करणे आपल्याला भाग पडते. मनाच्या निरोधासाठी आणि त्याला आपल्या इच्छेनुसार कोठेही नियुक्त करण्यासाठी विशेष प्रकारच्या अभ्यासाची आवश्यकता असते. त्यावाचून ही गोष्ट साध्य होऊ शकत नाही. धर्माच्या साधनेसाठी मनाचा संयम अत्यंत आवश्यक आहे. या साधनेत मनाला मागे वळवून त्याला स्वतःवरच स्थिर करावे लागते. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ९ अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन शुक्ल /शुध्द ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १ ऑक्टोबर २०२५ ★ महा नवमी
★ आयुध/शस्त्र पूजन, देवीला बलिदान
★ १८३७ भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू.
★ १८४७ भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, ४५० ग्रंथाच्या लेखिका, थिऑसाॅफिस्ट, होमरुल लीगच्या संस्थापिका अॅनी बेझंट यांचा जन्मदिन.
★ १९०६ जेष्ठ संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्मदिन
★ १९१९ विख्यात मराठी लेखक, कवी, गीतकार, पटकथाकार, अभिनेते, गीतरामायणकार, महाराष्ट्राचे वाल्मिकी गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्मदिन.
★ आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिन.
★ आंतरराष्ट्रीय संगीत दिन.
