
गणतंत्र न्यूज :, नांदगाव: शहरातील शांकांबरी नदी व कोल्हे नाला तसेच लेंडी नदीला महापूर आल्याने गावातील व हनुमान नगर येथील नदी पात्राजवळील घरात पाणी शिरले असुन. घरातील वस्तू वाहुन गेल्या आहेत तर काही ठिकाणी पुरात जनावरे देखिल वाहुन आल्याचे समजते. शनिवार रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.मैठ्याप्रमाणात महापुर महापूर परिस्थिती निर्माण झाली. दसरा दिवाळीच्या,तोंडावरती महापूर आल्यामुळे शेतकरी व कामगारांवरती, मोठे संकट निर्माण झाले आहे

नांदगाव व परीसरातील अनेक खेड्यात व, गावात महापुराने मोठ्या प्रमाणात शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे,त्यातच नांदगाव ,या गावातील ५० टक्के नागरिक कामगार असून त्यांच्या वरती, दसरा दिवाळी सणाच्या पुढे मोठे संकट निर्माण झाले आहे, कांदे,बाजरी,मका सारख्या पीक काढणीच्या कामामुळे त्यांना चांगले रुपये मिळाले असते पण मका,बाजरी भुईसपाट झाल्यामुळे, शेतकऱ्यांसोबतच कामगारांची सुद्धा बेहाल झाली आहे. सततच्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे अनेक घरांना चिऱ्या पडून भिंती कोसळले आहेत. शासनाने आतापर्यंत कोणतीही मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसून,व कामगारांना तर कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. ज्यांचे घरे ढासाळले असे सर्वांचे, पंचनामे सुद्धा झालेले नाही, तरी सर्व शेतकरी व कामगार यांचे शासनाला विनंती आहे की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना, प्रभावीपणे राबवून तात्काळ घरकुल मंजूर करावीत व कामगारांसाठी दसरा दिवाळी सणासुदी च्या सरकारने मदत करावी व शेतकऱ्यांना मदत करावी , पूर परिस्थिती शेतकरी व रोजदारी करून आपलं जीवन जगणारे कामगार, या सर्वांना या महापुराने पूर परिस्थितीमुळे संकटाचे मोठे डोंगर उभे राहिले आहे,

यामुळे शासनाने लवकर पाऊल उचलून, पंचनामे करून ताबडतोब मदत जाहीर करावी.असे सर्व शेतकरी व नुकसान ग्रस्तांची मागणी होत आहे.
