

नांदगावला शाकांबरी तुडुंब भरून वाहत आहे
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०४२ वा दिवस* विविधतेचा विनाश करून बाह्य विश्वात एकत्वाची स्थापना करणे हे नीतीचे कार्य कधीही नव्हते व पुढेही राहणार नाही, कारण हे असंभाव्य आहे व त्यामुळे विनाश व मृत्यू ओढवेल. पण नीतीचे ध्येय आहे विविधतेत एकत्व अनुभवणे, भीतिदायक परिस्थितीतही हृदयात ईश्वराची प्रचिती घेणे, बाह्यतः दुर्बलता दिसत असली तरी सर्वांच्या ठायी असलेली अनंत शक्ती ओळखणे आणि वरवर सर्व गोष्टी विपरीत दिसत असल्या तरी आत्म्याच्या अनंत, शाश्वत, स्वाभाविक शुद्धतेचा प्रत्यय घेणे. हेच आपल्याला जाणून घ्यावयाचे आहे. भारतीय मनोवृत्ती म्हणजेच वेदान्ती मनोवृत्ती विश्लेषणाभिमुख असल्यामुळे तिला विश्लेषणातून एकत्व गवसले आणि म्हणून तिने एकत्वाच्या तत्त्वावरच सर्व गोष्टी आधारित करण्याचा प्रयत्न केला.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर ६ अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन शुक्ल /शुध्द ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ ★ १८९८ स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्मदिन
★ १९२९ सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त गायिका, भारताची गाण कोकीळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्मदिन.
★ १९६७ थोर क्रांतिकारक व समाज सुधारक पांडूरंग महादेव तथा सेनापती बापट यांचा स्मृतीदिन
★ जागतिक रेबीज दिन.
