
लासलगाव, दिनांक २७ सप्टेबर ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर विभागाच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 हा राष्ट्रीय सेवा योजना आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत विविध उपक्रमांचे व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 28 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक पर्यटन दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. ‘युनेस्को च्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या 12 गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व’ या विषयावर प्रा.महेश होळकर यांनी व्याख्यानमालेचे सहावे पुष्प गुंपले. यावेळी मंचावर प्रा.नितीन शिंदे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे व प्रा.सुनिल गायकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती माता आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमास वक्ते म्हणून लाभलेले प्रा.महेश होळकर यांनी ‘युनेस्को च्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या 12 गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व’ या विषयावर रा.से.यो. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना युनेस्कोने महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांनी स्थापन व संवर्धन केलेल्या बारा गडकिल्ल्यांचा आपल्या यादीत समावेश केला. यासंदर्भात चित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देऊन गडकिल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.श्रावणी गाढे या स्वयंसेवीकेने केले, प्रास्ताविक कु.राधा राऊत यांनी केले, वक्ता परिचय कु.कोयल रणशूर यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन कु.रोहिणी जगताप या विद्यार्थीनीने केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे व रा.से.यो. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सर्व रा.से.यो. स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
