
सिन्नर (वसंत गोसावी प्रतिनिधी)सोनंबे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची 71 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली संस्थेचे चेअरमन तानाजी पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्हा. चेअरमन प्रविण पवार, एम. डी. पवार, केरु पवार, शरद रत्नाकर , ज्ञानेश्वर बोडके, भाऊसाहेब पवार, अनिल पवार, पंडित घोडे, सुरेश पवार, सुदाम पवार, तानाजी पवार, विलास पवार, दशरथ पवार, सोपान बोडके, दामु बोडके, सुधाकर नवले, वसंत गोसावी, सदाशिव पवार आदी उपस्थित होते

.सध्या संस्थेचे 879 सभासद आहेत.56 लाख 69 हजार 705 भागभांडवल असलेली संस्था सध्या तोट्यात आहे. 55 थकबाकीदार सभासदांकडेरुपये 36 लक्ष 46 हजारांची थकबाकी आहे. यातील काही सभासद मयत असून त्यांच्या वारसांना याबाबतची नोटीस देण्यात आली आहे. संस्थेने 15 लाख 15 हजारांची खत खरेदी करून सभासदांना अल्पदरात उपलब्ध करून दिले आहे.बी.एस.एन.एल. ला संस्थेने भाडेतत्त्वावर इमारत दिलेली असून त्या इमारतीचे दुरुस्तीचा ठराव करण्यात आला.

कर्मचाऱ्यांवर संस्थेचा 2 लाख 52 हजार रुपये खर्च होतो.लेखा परीक्षक पी. पी. गुळवे यांनी लेखा परीक्षण केलेल्या दोष दुरुस्ती अहवालाचे वाचन सचिव प्रकाश मोजाड यांनी केले. संस्थेला ब वर्ग मिळाला असून नफा वाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.मध्यम मुदत कर्ज थकबाकीदार वसुली साठी चर्चा करण्यात आली.संस्थेचे सभासद तसेच गोवर्धन पतसंस्थेचे चेअरमन शरद रत्नाकर यांना ज्ञानवंत पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे कर्मचारी बाळासाहेब म्हसाळ, सोमनाथ पवार आदींनी संयोजन केले.
