
सिन्नर ( वसंत गोसावी , प्रतिनिधी) सोनांबे ता. सिन्नर येथील जय भवानी मंगल कार्यालयात सह्याद्री सिन्नर फार्मर्स प्रोडूसर कंपनीतर्फे नुकतीच शाश्वत शेती व्याख्यानमाला संपन्न झाली. अन्न व पाणी व्यवस्थापन तज्ज्ञ अजित इंगळे, विलास शिंदे, रविकांत घोटेकर,डॉ .संजय पवार आदी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक नंदू पाटील पवार, शरद पवार, ज्ञानेश्वर पवार , श्री गायधनी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्जेदार शेतीसाठी पिकाचे पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे याबाबत अजित इंगळे यांनी मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांनी पाणी व माती परीक्षण अहवाल वाचन व त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पाण्याचे सूक्ष्म व्यवस्थापन करण्यासाठी इरिगेशन आहे तसे आता शेताला विद्राव्य खते देण्यासाठी फर्टिगेशन सिस्टीम वापरणे गरजेचे आहे. असेही श्री. इंगळे म्हणाले. माळेगाव औद्योगिक वसाहत सिन्नर येथील सह्याद्री इन्स्ट्रूमेंट्स कंपनी तर्फे रविकांत घोटेकर यांनी शेतकऱ्यांसाठी ब्लोअर संदर्भात माहिती दिली.येथील डॉ. संजय पवार यांनी नुकतीच डि. लीट. पदवी प्राप्त केल्याबद्दल अण्णा भागवत यांच्या हस्ते सत्कार केला. डॉ.पवार यांनी शेतीसाठी जशी योग्य मशागत आणि देखभाल गरजेची असते तशीच आपल्या मेंदूची देखभाल करण्यासाठी शेतकरी वर्गाने वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य वाचन करणे गरजेचे असते.

. ही दुर्मिळ पदवी डॉ. संजय पवार यांना मिळाल्याबद्दल सिन्नर सह्याद्री झोनचे प्रमुख श्री विलास शिंदे यांनी त्यांचा विशेष सन्मान केला.सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक सुदाम शिंदे यांनी केले.दत्तात्रेय डावरे यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अण्णा भागवत, मधुकर डावरे, योगेश शिंदे, शरद शिंदे, यांनी परिश्रम घेतले.
