
सिन्नर (वसंत गोसावी प्रतिनिधी) सोनांबे ता. सिन्नर येथे आई भवानी माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेस एकूण 106 सभासदांची उपस्थिती लाभली. संस्थेच्या अध्यक्ष सौ. इंदूताई सोपान पवार अध्यक्षस्थानी होत्या.

यावेळी उपाध्यक्ष सौ. कुसुम ज्ञानेश्वर जोर्वे व सर्व संचालक, सभासद उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजय भगवंत पवार यांनी सभेचे उत्तम नियोजन केले.सभेला देवनदी खोरे पतसंस्थेचे अध्यक्ष केरू पाटील पवार, सोनांबे विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष टी. आर. पवार, सुधाकर नवले, तंटामुक्ती अध्यक्ष दामोदर बोडके, संजय बोडके, प्रमिला पवार, तुकाराम बाबुराव पवार, त्र्यंबक करू पवार, तानाजी कारभारी पवार, सोपान नामदेव बोडके, गोविंद कडबाने आदींसह अनेक सभासदांनी हजेरी लावली. सभेत मागील वर्षाचे लेखा अहवाल, संस्थेच्या प्रगतीविषयी चर्चा तसेच आगामी वर्षातील कामकाजाबाबत नियोजन करण्यात आले. संस्थेच्या वाढत्या प्रगतीमुळे सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. संस्थेच्या सर्व सभासदांनी एकजुटीने सहभाग घेतला असून ही सभा यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. व्यवस्थापक संजय पवार यांनी सुत्रसंचलन करून आभार मानले.
