
नाशिक (-प्रतिनिधी) नाशिक शहर सिन्नर येथे सिटीलिंक बस चालकास शिवीगाळ करून, हातपाय तोडण्याची धमकी दिली.सदर सिटीलिंक बस चालक राजेंद्र रघुनाथ निकम वय (४०) वर्ष हे सिटीलिंक बस नाशिक-सिन्नर अशी कामगिरी करत असताना, सदर बस चालकाने सिन्नर येथील प्रवाशी पुढच्या दरवाजाने बस मध्ये आल्याने चालकाने विचारपूस केल्याच्या कारणावरून सदर व्यक्तीने आपल्या भावास फोन करून सिन्नर येथील वावी वेस येथे बोलवून घेऊन त्यासोबत पंधरा-वीस लोकांना सोबत मारण्यास आणून,सदर चालकावर दादागिरी करण्यात आली.सदर सिन्नर येथील रहिवाशी सागर कोथमिरे, शंभू कडवे,शाहू कडवे. सिटीलिंक बस चालक राजेंद्र निकम यांना शिवीगाळ करून, हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस किंवा आमदार, खासदार पण आमचे काहीच करू शकत नाही.अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. सिन्नर येथील पोलीस ठाण्यात चालकाने सदर गुन्हेगाराबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला. तरीपण या प्रकरणाला दोन दिवस उलटून गेले. पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.या अगोदरही अशा प्रकारच्या घटना घडवून गेल्या, महिन्या भरा अगोदर अशाच प्रकारची मारहाणीची घटना घडल्यानंतर मा. खासदार राजाभाऊ वाजे साहेब यांनी आश्वासन दिले की, यानंतर सिन्नरमध्ये अशा प्रकारचे कृत्य किंवा गैरवर्तन होणार नाही. याची मी दक्षता घेईल व झाल्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल.तरीपण सिन्नर येथे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यावरती खासदार वाजे साहेब यांनी लवकरात लवकर आरोपींवरती कडक कारवाई करून,त्यांना दंड करण्यात यावा. नाहीतर सिटीलिंक बस चालक-वाहक यांना नाईलाजाने नाशिक-सिन्नर सिटीलिंक बस सेवा बंद करण्यासाठी भाग पडेल.तरीपण खासदार वाजे साहेब व सिटीलिंक प्रशासन यांनी लवकर कारवाई करून, सिन्नर येथील प्रश्न मार्गी लावावा .तरी पण यावरती कडक कारवाई का? होत नाही. असा प्रश्न ही सिटीलिंक बस चालक-वाहक करत आहे..कारण या अगोदरही चालक व वाहक यांच्यावर सिन्नर येथे मारहाण करण्यात आलेली आहे. तरी पण यावरती सिटीलिंक प्रशासन अजून त्याकडे दुर्लक्ष करून, चालक व वाहक यांच्या संरक्षणासाठी मागील चार वर्षापासून अजून प्रक्रिया करत आहे. तरीपण अशा प्रकारच्या कृत्यामध्ये एखाद्या गरीब चालक किंवा वाहक रोजंदारीवर काम करत असताना, बळी गेल्यास अखेर सिटीलिंक प्रशासन मदत करील का?असा प्रश्न सिटीलिंक प्रशासनाबाबत निर्माण होतो. प्रशासन यावरती काही मार्ग का? काढत नाही. सिटीलिंक प्रशासन चालक-वाहक यांच्या जीवावरती फक्त आपली घरे भरवण्याचे काम करत आहे.असे दिसते. व सर्व चालक-वाहक यांना सुव्यवस्था व संरक्षण देऊनच सिन्नर येथील सिटीलिंक बस प्रश्न सोडवावा.अन्यथा चालक व वाहक यांच्या जीवाशी खेळू नये. सदर आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास सिटीलिंक बस चालक-वाहक आंदोलन किंवा सिन्नर सेवा बंद करण्यासाठी प्रयत्न करतील. असा प्रकारचा इशारा सर्व चालक व वाहक यांनी दिला.
