सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०४१ वा दिवस
आसक्तीचा संपूर्ण त्याग करण्याचे दोन मार्ग आहेत. पैकी पहिला अशा व्यक्तींसाठी आहे की ज्यांचा ईश्वरावर किंवा कसल्याही बाहेरील साहाय्यावर विश्वास नाही. त्यांना स्वतःच्याच कौशल्यावर किंवा साधनांवर भरवसा ठेवणे प्राप्त आहे. आपल्या इच्छाशक्तीच्या, मनःशक्तीच्या आणि विवेकविचाराच्या जोरावरच त्यांना कार्य करावयाचे असते. त्यांना ठासून म्हणावे लागेल 'मी अनासक्त होईनच'. ज्यांचा ईश्वरावर विश्वास आहे अशांचा मार्ग याहून भिन्न असतो. आणि तो त्या मानाने पुष्कळच सोपाही आहे. कर्माचे समस्त फल ते भगवंताच्या श्रीचरणी समर्पण करीत असतात. आणि म्हणून कर्म आचरूनही ते फलांवर आसक्त होत नाहीत. सारे त्या प्रभूचेच आहे, म्हणून समस्त फल प्रभूलाच अर्पण करतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ५ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन शुक्ल /शुध्द ६
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २७ सप्टेंबर २०२५
★ १८३३ समाजसुधारक, धर्मसुधारक, ब्राम्हो समाजाचे संस्थापक, आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहनराय यांचा स्मृतिदिन.
★ १९०७ क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्मदिन
★ १९२९ ‘काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शिवराम महादेव परांजपे यांचा स्मृतीदिन
★ १९९२ अनुताई वाघ कोसाबाड येथील आदिवासींच्या विकासासाठी काम करणाऱ्या समाजसेविका, शिक्षणतज्ञ अनुताई वाघ यांचा स्मृतीदिन
★ जागतिक पर्यटन दिन.
