
सिन्नर (वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी) –सिन्नर तालुक्यातील शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, सिन्नर यांच्या वतीने शिक्षक नेते अंबादासजी वाजे स्मृती दिनानिमित्त सन 2025–26 या वर्षाचे ‘शिक्षकरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये सहा गुणी शिक्षकांचा तसेच एका शाळेचा सन्मान होणार असून, त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली आहे.
शिक्षकरत्न पुरस्कार विजेते शिक्षक याप्रमाणे–
राजेंद्र आंबेकर – गुळवंच शाळा, सिन्नर बीट.
राजेंद्र आहेर – सोनारी शाळा, पांढुली बीट.
अशोक जाधव – मेंढी शाळा, वडांगळी बीट.
कैलास पवार – पाटोळे शाळा, डुबेरे बीट.
ज्ञानेश्वर दिघे – पिंपरवाडी शाळा, वावी बीट.
साईन बानो सय्यद – नायगाव शाळा, ब्राम्हणवाडे बीट.
जीवन गौरव पुरस्कार 2025 : माजी मुख्याध्यापक कै. दशरथ दामोधर शेजवळ (जिल्हा परिषद शाळा कुंदेवाडी) यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे.
आदर्श शाळा पुरस्कार 2025 : जिल्हा परिषद शाळा पांगरी बु. या शाळेचा उपक्रमशील शाळा म्हणून गौरव केला जाणार आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार असून, प्रमुख उपस्थिती म्हणून मा. खासदार राजाभाऊ वाजे, मा. जि.प. सदस्या सिमंतीनी कोकाटे तसेच मा. गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल मार्गदर्शन करणार आहेत.या सोहळ्याला सर्व शिक्षक व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन प्रदीप शिंदे, व्हा. चेअरमन रेणुका गोराडे, मानद सचिव भास्कर सदगीर, तसेच संचालक मंडळातील महेश गायकवाड, बाळासाहेब चव्हाणके, कैलास पवार, अंकुश सहाणे, गोरक्ष सोनवणे, सुरेश गोसावी, दिपक बागुल, मोतीराम इलग, ललिता वाजे, रंजना भालेराव, जिजाबाई धिंदळे व शोभा म्हस्के यांनी केले आहे. या सन्मानाने सिन्नर तालुक्यातील शिक्षकांची प्रेरणादायी कार्यगाथा अधोरेखित होणार असून, शिक्षण क्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण होणार आहे.
