
सिन्नर (प्रतिनिधी ) २५ सप्टेंबर,,२०२५ क्रांतिकारक हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या ९५ व्या स्मृतीदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले यावेळी क्रांतिकारक हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले *या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे यांनी नाग्या कातकरी यांच्या जीवन आधार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की* भारतात स्वातंत्र्याच्या लढयात वनात राहणाऱ्या आदिवासी समाजचे मोठे योगदान होते, ते आपल्याला विसरता कामा नये. वेळप्रसंगी आपल्या प्राणाची आहुतीही दिली आहे.

आदिवासीनीही गुलामगिरीविरुध्द लढा काय असतो हे आपल्या बलिदानातून वेळोवेळी दाखवून दिले आहे,इंग्रज सरकारने १९३० च्या दरम्यान आदिवासी समाजचा जंगलावरील हक्क नाकारला होता. जंगलातून लाकूड, गवत गोळा करणे, फळे व वनौषधी गोळा करण्यावरही निर्बंध लादले. गाई – म्हशींनाही जंगलात सोडण्यास मज्जाव करण्यात आला. या अन्यायाविरोधात देशभर आंदोलन सुरू झाले. त्यातीलच एक आंदोलन म्हणजे चिरनेरच्या जंगलात कोयते, कुऱ्हाडी घेऊन कातकरी त्या आंदोलन सहभागी झाले. या आंदोलनात पाच हजार आदिवासी समाज गोळा झाला होता.नाग्या कातकरी यांनी आपल्या आदिवासी समाजाचा हक्क अधिकार साठी मोठा संघर्ष केला अशा म्हणाले तसेच *विजय मुठे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की* नाग्या कातकरी यांनी इंग्रजाच्या विरोधात बंड पुकारले म्हणून इग्रंजानी अक्काबाईच्या जंगलात पोलिसांनी आदिवासी लोकवर गोळीबार केला. लोक सैरभैर झाले, पांगले. त्या गर्दीत नाग्याच्या आरपार गोळी घुसली. नाग्या कातकरी जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयाचे उपचार मिळाले नाही म्हणून नाग्या कातकरी यांना दि.२५ सप्टेंबर १९३० हौतात्म्य प्राप्त झाले अशा महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादनअभिवादन करण्यासाठी महामित्र दत्ता वायचळे,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे ठाकरे सेनाचे युवा सेना प्रमुख किशोर बोऱ्हाडे, शाम डांगे,सुदर्शन बिन्नर, योगेश बिन्नर, कार्तिक मुठे,आरव वायचळे आदी.उपस्थित होते
