
-**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०४० वा दिवस* पुरुषांच्या शिक्षणाची जशी केंद्रे उघडण्यात येतील, तशीच स्त्रियांच्याही शिक्षणासाठी उघडावयास हवीत. सुशिक्षित व सच्चरित्र ब्रह्मचारिणी या केंद्रातील स्त्रियांच्या शिक्षणाचा भार घेतील. पुराण, इतिहास, गृहकृत्ये, कला, कौटुंबिक जीवनांतील कर्तव्ये व आदर्श चारित्र्य घडविण्याला साहाय्यक असणारे नीतिनियम आधुनिक विज्ञानाच्या मदतीने शिकवावयास हवेत. धर्मपरायणता, नीतिपरायणता विद्यार्थिनींच्या अंगी बाणावयास हवी. त्या सुगृहिणी होतील असे कसून प्रयत्न करावयास हवेत. अशाच सुगृहिणींची मुलेबाळे पुढे या बाबतीत अधिक उन्नती करू शकतील. सुशिक्षित आणि नीतिपरायण मातांच्या पोटीच थोर लोक जन्माला येतात. *स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर ४ अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन शुक्ल /शुध्द ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २६ सप्टेंबर २०२५ ★ १८२० बंगाल मधिल समाजसुधारक, तत्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ, उद्योजक इश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्मदिन
.★ १८९४ लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा जन्मदिन
★ १९२३ सदाबहार हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माते देव आनंद यांचा जन्मदिन.
★ १९३२ जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्मदिन.
