
नाशिक (प्रतिनिधी ) १८५ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय,नाशिक या संस्थेचा ५६ वा *जिल्हा साहित्य मेळावा* २७ व २८ सप्टेंबर २०२५ ला आयोजित करण्यात आला आहे, यामध्ये कवी संमेलन, परिसंवाद, लेखकांची मुलाखत, पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम आहे, आपण आवर्जून उपस्थित राहावे व सहभागी व्हावे.

उद्घाटक…सुप्रसिद्ध बालसाहित्यिक मा. सुरेश सावंत (बालसाहित्य अकादमी विजेते २०२५ )
अध्यक्ष…. *मा. बी. जी. शेखर पाटील (साहित्यिक व मा.विशेष पोलिस महानिरीक्षक )
कविसंमेलन अध्यक्ष – मा.तुकाराम धांडे ( सुप्रसिद्ध रानकवी)
या सांस्कृतिक व साहित्यिक मेजवानीचा आपण आस्वाद घेण्यासाठी , तेव्हा वेळ राखून ठेवा, शनिवारी सांयकाळी ५.०० वा. ते रविवार पूर्ण दिवस. आपणास आग्रहाचे निमंत्रण….! तेव्हा आपण नक्की या…!
स्थळ – मु. श. औरंगाबादकर सभागृह, टिळकपथ रोड, शालिमार, नाशिक
स्वागतोत्सुक कवी राजेंद्र सोमवंशी सदस्य,सांस्कृतिक कार्यसमितीसार्वजनिक वाचनालय , नाशिक
