
लासलगाव, दिनांक 25 सप्टेबर ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर विभागाच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 हा राष्ट्रीय सेवा योजना आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत विविध उपक्रमांचे व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त व्याख्यानमालेचे चौथे पुष्प महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी गुंफले.

सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती माता, तरुणाईचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.चन्द्रकांतदादा पाटील यांच्या एक घंटा, एक साथ” राष्ट्र स्वच्छता अभियान उपक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण सर्व स्वयंसेवकांना दाखविण्यात आले. त्यानंतर सर्व स्वयंसेवकांना ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाची शपथ देण्यात आली. “एक दिन, एक घंटा, एक साथ” राष्ट्र स्वच्छता अभियान या उपक्रमांतर्गत रा.से.यो. स्वयंसेवकांनी संपूर्ण महाविद्यालय परिसरात स्वच्छता केली. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांनी पंडित दीनदयाळ यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा आढावा घेत स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने स्वत:पासून स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागाचे प्रा.किशोर गोसावी होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रत्येक स्वयंसेवकाने स्वच्छतेचा मूलमंत्र विद्यार्थी दशेतच अंगीकारावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.वैभवी आहेर या विद्यार्थिनीने केले, वक्ता परिचय कु.श्रद्धा शिंदे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन कु.दिप्ती ठाकरे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे व रा.से.यो. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी प्रा.महेश होळकर, प्रा.रामसिंग वळवी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर व सर्व रा.से.यो. +२ स्तर चे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
