
इगतपुरी (प्रतिनिधी ) पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवडा उत्साहातघोटा येथे शहर भाजपाच्या वतीने पं दिनदयाल उपाध्याय यांची जयंती पार्टी कार्यालयात साजरी करण्यात आली पं दिनदयाल यांना जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे व शहराध्यक्ष प्रफुल कुमट यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी पंडितजींचा जीवनपट सांगताना भाजपा नेते भास्करराव गुंजाळ यांनी सांगितले कि 1916 साली जन्मलेल्या पंडितजीनी 1942 पासुन पूर्णवेळ संघांचे प्रचारक म्हणून काम बघितले तर प्रचंड अभ्यास करून एकात्ममानवतावाद यावर ते ठाम राहून कार्य केले निखिल हंडोरे यांनी त्यांनी केलेल्या कार्याचा उजाळा केला

याप्रसंगी घोटी शहर महिला मोर्च्याच्या चिटणीसपदी सौ करुणा तांगडे यांची नियुक्ती पत्राद्वारे करण्यात आलीया कार्यक्रमासाठी घोटी शहराध्यक्ष प्रफुल कुमट, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब डोंगरे, भाजपा नेते भास्करराव गुंजाळ, महिला मोर्च्याच्या पल्लवी शिंदे, प्रतिभा काळे, सुनीता सिंगल, करुणा तांगडे, वैशाली भोर, अशोक पिचा, अनिल परदेशीं, अरुण शेलार, बाळासाहेब पुणेकर, निखिल हंडोरे, योगेश सोनवणे, ऋषभ बोरा, आनंदराव सारुक्ते, देविदास काळे, बापु ताथेड इ पदाधिकारी उपस्थित होते
