
नांदगाव (नाशिक). संपूर्ण महाराष्ट्रात राज्यभर धनगर आरक्षण बाबत विविध ठिकाणी उपोषण सुरू आहे भारतीय राज्यघटनेनुसार धनगड या जमातीचा समावेश आदिवासी प्रवर्गात केला आहे परंतु 2019 मध्ये राज्य सरकारने दिलेल्या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रात धनगड जमातीच्या एकाही व्यक्तीचे प्रमाणपत्र आढळत नाही त्यामुळे राज्यभरात असलेले धनगड हे धनगर आहेत या बाबीचा सकारात्मक विचार करून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी व सर्व धनगर बांधवांचे अनुसूचित जमातीचे एसटी प्रवर्ग प्रमाणपत्र देण्याबाबतचे निवेदन नांदगाव तहसीलदार सुनील सौंदाणे यांना देण्यात आले या वेळी अहिल्यादेवी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तू व्हडगर( पाटील) , धर्मा बीडगर,रतीलाल धरणे, विकास पाटील,मंगलेश पाटील,आदी यावेळी उपस्थित होते. आदिवासी प्रमाणपत्राची अंमलबजावणी न झाल्यास संपूर्ण धनगर समाज राज्यभर तिव्र स्वरुपाचे आंदोलन करेल असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

