
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०३९ वा दिवस* हे विश्वमहामानवांनो, हे दिव्यलोकनिवासी देवतांनो, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, अमृताचे वारसदार आहात. तुम्ही त्या अमृतस्वरूप परम पुरुषाचे संतान आहात. अज्ञानरूपी तमापलीकडे विराजमान असलेल्या त्या ज्योतिर्मय परम पुरुषाचे दर्शन प्राप्त करून घेणे, या अंधारलेल्या आयुष्यातून त्या प्रकाशमय जीवनाकडे जाण्याचा तो हाच मार्ग आहे. आपले हे अंधकारमय जीवन ही मृत्यूची खाई ओलांडून जाण्याचा आणखी दुसरा मार्ग नाही. मानवाला त्याच्या ठिकाणी वास करणाऱ्या ईश्वर तत्त्वाचा उपदेश देणे आणि जीवनातील प्रत्येक कार्यात हे ईश्वर तत्व कसे प्रकट करावे यासंबंधीचा मार्ग दाखवून देणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर ३ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन शुक्ल /शुध्द ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ ★ १९१६ जनसंघाचे एक संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्मदिन
.★ १९२० भारतीय आकाश संशोधन संस्था इस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. सतिश धवन यांचा जन्मदिन.
★ १९२२ स्वातंत्र्यसैनिक, अतिशय विद्वान, स्पष्टवक्ते, संसद सदस्य, घटनातज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्मदिन.
★ १९२८ जेष्ठ पत्रकार माधव गडकरी यांचा जन्मदिन
.*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
