
*लासलगाव (प्रतिनिधी )येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.किशोर गोसावी होते तर प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे आणि उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे होते. तसेच याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर इत्यादी उपस्थित होते.

सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती माता, राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि तरुणाईचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पूजा खैरे यांनी केले तर प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे आणि वक्ता परिचय प्रा.सुनिल गायकर यांनी करून दिला. तर कार्यक्रमाचे आभार कु.प्रिया रासकर या विद्यार्थिनीने मानले. राष्ट्रीय सेवा योजना गीताने या कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि सर्व रा.से.यो. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
