
डुबेर ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ व्या द्वितीय राज्याभिषेक सोहळा व १५२ व्या सत्यशोधक समाज वर्धापन दिन. डुबेरे ग्रामस्थच्या वतीने साजरा करण्यात आला महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास व राष्ट्रपिता महत्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार मानवंदना देण्यात आली *या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण शेठ वाजे म्हणाले की* छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला राज्याभिषेक हा ६ जून १६७४ झाल्यानंतर द्वितीय राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ रोजी तांत्रिक पद्धतीने झाला त्याच्या शाक्त शिवराज्याभिषेक दिन च्या हार्दिक शुभेच्छ दिल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि जीवन कार्याचा परिचय करून देत रयतेच्या राजाचे स्वराज्य निर्मितीसाठी चे योगदान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्वच मावळ्यांना अभिवादन सत्यशोधक सामजाची स्थापना महात्म फुले यांनी २४ सप्टेंबर २८७३ रोजी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८६९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी रायगडावरती शोधून काढली आणि इतिहासातील रयतेच्या राजाला मानवंदना दिली त्यामुळे अशा महान विचारवंताला महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन *या कार्यक्रमाचे सुञसंचलन रामदास वारुंगसे यांनी केले तर प्रास्ताविक सरपंच रामनाथ पावसे यांनी केले तर आभार माजी सरपंच शरद माळी यांनी मानले* यावेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्था संस्थापक अध्यक्ष नारायण वाजे, ग्रामपंचायत सरपंच रामनाथ पावसे ,पोलीस पाटील रामदास वारुंगसे, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन अशोक गवळी, मोहन माळी,उद्योजक अण्णासाहेब वारुंगसे ,माजी सरपंच शरद माळी ,नवनाथ ढोली ,मंगेश वाजे ,अनिल वारुंगसे ,विष्णू वारुंगसे ,निवृत्ती वाजे ,एकनाथ कुंदे, हिरामण माळी, दत्तू वारुंगसे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
