
सिन्नर(प्रतिनिधी ) २४ सप्टेंबर २०२५ छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक सोहळाच्या निमिताने महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने शिवरायनां अभिवादन या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की*छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक २४ सप्टेंबर १६७४ रोजी रायगडावर झाला. हा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने करण्यात आला होता. पहिला राज्याभिषेक (६ जून १६७४) झाल्यानंतर, रायगडावर काही घडली होती आणि त्यामुळे निवाळपुरी नावाच्या गोसावी २४ सप्टेंबर १६७४ रोजी रायगडावर महंत निक्षलपुरी गोसावी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय शाक्त धर्म पध्दतीने शिवराराज्याभिषेक तंत्रक पध्दतीने पार पडला होता या उत्सवाची परंपरा सुरू केली या ऐतिहासिक कार्यला अभिवादन करने करत समाज बांधवांनी आपल्या भावी पिढीसाठी हा ऐतिहासिक वारसा जपणे व पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केली जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले २४ सप्टेंबर १६७४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाक्त धर्म पद्धतीने दुसरा राज्यभिषेक केला.आज ३५१ व्या *शाक्त शिवराज्याभिषेक* दिनाच्या हार्दिक शुभेच्छ तसेच २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आज १५२ व्या *सत्यशोधक समाज* स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिले व या निमित्ताने महामित्र दत्ता वायचळे यांनी मिठाई वाटप केली *या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे तर आभार राजेंद्र सातपुते यांनी मानले*याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे ,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,राजेंद्र सातपुते, प्रकाश माळी,शरद शिरसाठ संजप पोटे ,नितीन शिरसाठ, किशोर शिरसाठ गणपत काळे संजय भाटजिरे, शंकर शिंदे, रविंद्र पवार,राजेंद्र देशमुख, बापु चव्हाण, जितेंद्र परदेशी, धनंजय परदेशी विलास ताडगे, गोपीनाथ वाजे,आदि.उपस्थित होते
