
सिन्नर (प्रतिनिधी ) या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महत्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले*या कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता वायचळे म्हणाले की* मागासवर्गयना लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली होती. या संस्थेचा मुख्य उद्देश जमीनदार, शेटजी आणि पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महाराष्ट्रात पंतोजी व शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू केली.जोतिबा फुले हे क्रांतिकारी नेते होते त्यांना सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान मानताना त्याचप्रमाणे सत्य हेच परम मानवी सद्गुणांची जोपासना अशाप्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्त्वज्ञान मांडले. ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी, त्यामध्ये मध्यस्थाची अथवा भट भिक्षूची आवश्यकता नाही, अशा म्हणाले*यावेळी विजय मुठे म्हणाले की* मानवता धर्माची शिकवण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला. सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवताना सत्यशोधक समाजाने समाजातील दीनदलित उपेक्षीत समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने गुलामगिरीच्या विरुद्ध आवाज उठविलासत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.अशा या महान विचारवंता च्या कार्याला क्रांतिकारक अभिवादनयाप्रसंगी महामित्र यांनी मिठाई वाटप केली*या कार्यक्रमाचे सुञसंचलन शिवाजी सातभाई यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे तर आभार अजय लोंढे यांनी मानले* याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे, नितुजा वळवी,प्रिती वळवी,शिवाजी सातभाई, पोपट लोंढे अजय लोंढे गणेश भोत, जितेंद्र साबळे भानुदास मुठे रोहित मुठे आदी उपस्थित होते
