
नाशिक:-(प्रतिनिधी ) साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया), पुणे या संस्थेच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नाशिकस्थित साखरतंत्रज्ञ वाळू रघुनाथ आहेर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईच्या एमएससी बँकेचे चेअरमन विद्याधर अनासकर, सहकार आयुक्त संदीप तावरे, यशदा महासंचालक शेखर गायकवाड, बी.बी.ठोंबरे, निराणी उद्योग समूहाचे चेअरमन निराणी, डॉ.आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अरविंद गोरे, सुप्रिया आहेर, सुकदेव आहेर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. भारतीय साखर उद्योगात चाळीस वर्षांहून अधिक काळ सेवा, संशोधन, देश-विदेशातील विविध संस्थांमध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल वाळू आहेर यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. साखर उद्योगात कर्तव्यनिष्ठ, दूरदृष्टी असलेल्या या विचारवंत तांत्रिक सल्लागाराचा गौरव झाल्याबद्दल सहकारी साखर उद्योगातील मान्यवर, हितचिंतक, अधिकारी, सहकारी आणि मुखेड ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
