
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०३८ वा दिवस* आमच्या देशातील स्त्रियांना तुमच्या देशातील ती बौद्धिक उंची प्राप्त झाली तर ते मला अतिशय आवडेल; परंतु ही गोष्ट पावित्र्याचा बळी घेऊन होणार असेल तर ते मला नको आहे. तुमच्या सर्व ज्ञानाबद्दल मला तुमचे कौतुक वाटते. परंतु, जे वाईट आहे त्यावर गुलाबांचे पांघरूण घालून त्याला लपविण्याचा आणि त्यालाच चांगले म्हणण्याचा तुम्ही जो प्रयत्न करता, तो मला आवडत नाही. बौद्धिक विकास हीच काही सर्वांत जास्त श्रेयस्कर अशी गोष्ट नव्हे. आम्ही नैतिक आणि आध्यात्मिक विकासासाठीच प्रयत्न करीत असतो. आमच्याकडील स्त्रिया फारशा सुविद्य नाहीत हे खरे. परंतु त्या अधिक शुद्ध आहेत. प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीखेरीज इतर सर्व पुरुष पुत्रवत् मानले पाहिजेत. *स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २ अश्विन (इषमास) शके १९४७
★ अश्विन शुक्ल /शुध्द ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २४ सप्टेंबर २०२५ ★ १५३४ शिख धर्माचे चौथे गुरू रामदास यांचा जन्मदिन
★ १८६१ प्रदेशातील भारतीय क्रांतीकारकांच्या आधारस्तंभ, १९०७ मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारतीय स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून वंदे मातरम लिखित तिरंगा ध्वज फडकविणार्या महिला क्रांतीकार मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्मदिन.
★ १९५० जेष्ठ क्रिकेटपटू, समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्मदिन.*
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
