
ढेकू (प्रतिनिधी )ढेकू आश्रम शाळेत गोवर व रूबेला मोहिमेअंतर्गत लसीकरण केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधी मध्ये लसीकरण मोहीम अंतर्गत सर्व आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गोवर व रूबेला आजाराचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने आज ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्राथमिक आरोग्य केंद्र बोलठाण यांच्याकडून मोफत लसीकरण करण्यात आले सर्वप्रथम कार्यक्रम प्रसंगी आश्रम शाळेत नांदगाव तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री संतोष जगताप साहेब यांनी गोवर व रूबेला आजार संबंधी माहिती सांगितली

तसेच त्या आजाराची लक्षणे व परिणाम याबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व व आवश्यकता याची माहिती पटवून सांगितली. सर्वप्रथम आश्रम शाळेत आलेले वैद्यकीय अधिकारी श्री जगताप साहेब यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री जितेंद्र थोरात यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले .त्यांच्या समवेत आलेले आरोग्य निरीक्षक श्री चव्हाण साहेब यांचे स्वागत प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री दोधा सूर्यवंशी यांनी केले तर डॉक्टर दत्तात्रय मोरे सर यांचे स्वागत शाळेचे अधीक्षक श्री नितीन नितांनकर यांनी केले. समवेत डॉक्टर पाडवी ,डॉक्टर मंसूरी ,(आरोग्य सहाय्यक )ईस्टर राठोड (सहायिका नांदगाव )डॉक्टर साळुंखे मॅडम डॉक्टर जाधव , विशाल पवार निलेश काकळीज ,अतुल मोरे ,साहेबराव काटकर आदींनी लसीकरण केले लसीकरण मोहीम यशस्वीतेसाठी ढेकू ,जातेगाव व बोलठाण येथील सर्व आशा सेविका व आश्रम शाळेतील भाऊसाहेब देवरे,सना कामडी,रविंद्र चव्हाण ,रविंद्र धाकतोडे,योगेश जानराव श्रीमती गीतांजली भामरे प्रतिभा ताकटे,शीतल गायकवाड सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांचे आभार शाळेच्या वतीने अधिक्षक श्री नितीन नितानकर यांनी मानले
