
मविप्र चित्रकला स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे प्रदान करतांना प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील,कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे,सुधीर तांबे.
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मविप्र चित्रकला स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.या परीक्षेसाठी विद्यालयातील इ.५ वी ते १० वीच्या एकुण ६४४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन १००% निकाल लागलेला आहे.जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत विद्यालयातील दोन विद्यार्थीनींनी यश संपादन केले. इ.७ वी ८ वीच्या क गटात कु.अनन्या ज्ञानेश्वर गायकवाड हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. इ.९ वी १० वीच्या ड गटात कु.अवनी देविदास भोये हिने चतुर्थ क्रमांक मिळविला.या सर्व यशस्वी विद्यार्थीनींना प्राचार्य संजय डेर्ले व पर्यवेक्षक सुनील पाटील यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र व २००/-रु. रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.यशस्वी विद्यार्थीनींना कलाशिक्षक सोमेश्वर मुळाणे व सुधीर तांबे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र सरचिटणीस अॅड.नितीन ठाकरे,मविप्र अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,संचालक रमेश आबा पिंगळे,माजी सेवक संचालक डॉ.अशोकराव पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ.भास्करराव ढोके,अभिनव शालेय समिती अध्यक्ष निवृत्ती महाले,उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष पंडितराव पिंगळे,कला व वाणिज्य महाविद्यालय समिती अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन शालेय समिती अध्यक्ष शंकरराव पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड,शालेय समिती सदस्य, मविप्र सभासद,ग्रामस्थ,प्राचार्य संजय डेर्ले,उपमुख्याध्यापिका विमल रायते,पर्यवेक्षक सुनील पाटील,सर्व शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले*
