
चतुर्थ चरण चाचणी शिबिर नाशिक स्काऊट अँड गाईड कार्यालयात मोठे उत्साहात संपन्न..
नाशिक ( प्रतिनिधी). महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईड कार्यालया मार्फत नाशिक जिल्हा कार्यालय येथे राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी शिबिराचे कब विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. या चाचणी शिबिरात नाशिक जिल्ह्यातील शिबिर प्रमुख तथा मुंबई राज्य कार्यालय अधीक्षक संतोष दुसाने यांच्या नेतृत्वाखाली नासिक जिल्हा संघटक श्रीनिवास मुरकुटे, कब मास्टर बापू चतुर, गणेश गांगोडे यांनी सहाय्यक शिबिर प्रमुख म्हणून काम पाहिले. या चाचणी शिबिरात नाशिक जिल्ह्यातील एस.जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभाग सिन्नर अभिनव बालविकास मंदिर उत्तम नगर, प्राथमिक विद्यालय उंटवाडी, बालशिक्षण मंदिर गोरेराम लेन, अभिनव बालविकास मंदिर गंगापूर रोड, सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण नाशिक, डे केअर सेंटर प्राथमिक शाळा, इंदिरानगर, बाल विद्या मंदिर सीबीएस नाशिक, वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर गंगापूर रोड, रचना प्राथमिक विद्यालय नाशिक, इत्यादी शाळा मधील 106 कब विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. राज्यस्तरीय चतुर्थचरण चाचणी शिबिरात कब मधील अभ्यासक्रमावर आधारित लेखी,तोंडी प्रात्यक्षिक घेण्यात आले.

सायंकाळी शेकोटी कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी अल्पोहार व स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षक म्हणून बापू चतुर, गणेश गांगोडे, संजय चौरे , स्मिता गायकवाड यांनी काम पाहिले. समारोप प्रसंगी शिबिर प्रमुख संतोष दुसाने यांनी आत्मविश्वास हा यशाचा राजमार्ग आहे. ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा. बाल वयात चाचणी शिबिरातून आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होते. आपल्या मनोगतात व्यक्त केले. सहज योग ध्यान केंद्र नाशिक यांनी मेडिटेशन प्रात्यक्षिक करून ध्यान धारणेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाप्रसंगी नाशिक जिल्हा गाईड संघटक कविता वाघ , शिबिरासाठी आलेल्या सर्व शाळेतील कब मास्टर शिक्षक उपस्थित होते. राज्यस्तरीय चतुर्थ चरण चाचणी शिबिरासाठी कविता पाटील, सोनू बोरसे, भोजराज वनिता, आनंद जगताप, खंडू आरगडे, थोरात आर्यन कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी शिबिरा यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
