
नाशिक (ज्ञानेश पिसे) पंचवटीच्या फिरत्या चाकावरती एकतेला आकार!ऑन व्हील* इफ्तीयार पार्टी चे आयोजन प्रवासी संघटना डायनामिक ग्रुप यांच्या समवेत करण्यात आले.सदभावनेची देवाण घेवाण करणारी पंचवटी एक्सप्रेस या निम्मिताने सजवण्यात आली होती. भारत माता की जय या उदघोषत राष्ट्रगान चे सुर पंचवटी एक्सप्रेस मध्ये गुंजले आणि “जन गण मन अधिनायक जय है ” भारत भाग्य विधाता ” या जयघोषात अवघा प्रवासी वर्ग अभिमानाने एक झाला. माहे रमजान या पवित्र महिन्यात सदभावना व एकत्वाचे दर्शन जागो जागी होत आहे.आपल्या बोगीत अनेक संस्कृती,विविध धार्मिक कार्य आणि भिन्न भिन्न चाली रीतीच्या लोकांना एकत्र गंतव्य स्थानाला घेऊन जाण्याचे काम चाकरमान्याची आवडती मनमाड -नाशिक- मुंबई जाणारी पंचवटी एक्सप्रेस इमाने इतबारे करते.भारतीय संस्कृती वहनामध्ये रेल्वेची भूमिका महत्वपूर्ण आहे.पंचवटी एक्सप्रेस कसारा घाटातून दि. 2० मार्च ला येतांना वेगळाच अनोखा अनुभव आपल्या सोबत घेऊन आली.मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यात सहेरी व इफ्तीयार ला महत्व आहे.उपवास सोडतांना इफ्तीयार सगळ्यासोबत केल्याने एकत्वाची भावना अधिक प्रबळ होऊन पवित्र कार्य अल्ला दरबारीं रुजू होते या उदात्त हेतूने पंचवटी एक्सप्रेस मध्ये मुस्लिम व हिंदू बांधवातर्फे यंदा इफ्तीयारचे आयोजन करण्यात आले होते.

‘यह पहला सबक है किताबे हिदा का…’ ‘मखलुख सारा है कुणबा खुदा का !’धर्म कुठलाही असो तो माणसाला माणूस मन्हून जगायला शिकवतो.या माणूसपणाच्या प्रवासात असे मिलवर्तनाचे क्षण येतात जे केवळ इव्हेंट मन्हून नव्हे तर एक मानवतेच्या या हारामध्ये फुल मन्हून गोवता येतात आणि याचा सुगंध साऱ्या समाजाला सुगंधित करतो.या प्रकारचे आयोजन ते ही चालत्या ट्रेन मध्ये करणे याला एक सकारात्मक नजरिया लागतो आणि ती सदृढ मानसिकता पंचवटी एक्सप्रेस प्रवासी बाळगून आहेत याचा मला मनस्वी आनंद होतो आहे.इफ्तीयारचे आयोजन हे केवळ उपवास सोडवणे या पुरते मर्यादित नाही या मागे एक व्यापक दृष्टीकोन आहे.नाशिककर चाकरमान्या मध्ये विविध स्तरातील कर्मचारी आहेत.यात आयुक्तालया पासून मंत्रालया पर्यन्त ते विविध खाजगी,सरकारी नोकरदार यांचा समावेश पंचवटी एक्स.प्रवासी यांच्यात आहेत.समाजाचा एक सुशिक्षित वर्ग रोजच विचारांचे आदान प्रदान करित प्रवास करित असतात.इफ्तीयर च्या निमित्ताने मागील दोन वर्षापासून बंद असलेली ही परंपरा पुन्हा चालू झाली.इ.स.2011 पासून या इफ्तीयार च्या आयोजनाला सुरवात करण्यात आली असून कुठल्याही राजकीय संघटनेने हे आयोजन पुरस्कृत केलेले नसून अनेक मान्यवरांनी आजवर यात सहभाग नोंदवला आहे.या साठी लागणारे फळे, विविध पदार्थ हे मुंबईवरून दिवसभर आपली ड्युटी सांभाळून संध्याकाळी गाडी मध्ये आणण्याचे अचूक नियोजन केले जाते.आठवडाभरापुर्वी पासून या कामाचे नियोजन वाटून देण्यात येते याच्या व्यवस्थापनात तब्बल 50 जणांचा ग्रुप या कामी राबतो व आयोजन यशस्वी होते. ” माना की अंधेरा घना है..मगर दीप जलाना कहा मना है !”या न्यायाने एक छोटासा प्रयत्न मानवतेच्या जपवणुकीसाठी हरेकाने केल्यास नक्कीचं समाज सदृढ होईल यात काही शंका नाही.
