
**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०३७ वा दिवस* ज्या महामायेच्या रूपरसात्मक बाह्य आविष्कारांना भुलून माणूस अगदी उन्मत्तप्राय होऊन अडकून पडतो, पण जिच्या ज्ञान, भक्ती, विवेक, वैराग्यादी आतील आविष्कारांनी तो सर्वज्ञ, सिद्धसंकल्प, ब्रह्मज्ञ होतो, त्या जगन्मातेच्या सजीव मूर्तीच अशा स्त्रियांची पूजा करायला मी कधीच निषेध केला नाही. ‘सेषा प्रसन्ना वरदा नृणां भवति मुक्तये’- ‘ती प्रसन्न झाल्यास माणसाला वर देऊन मुक्त करते.’ या महामायेला पूजावंदनादीद्वारा जोवर प्रसन्न करून घेत नाहीत, तोवर काय मजाल आहे ब्रह्माविष्णूमहेशादिकांची देखील की ते तिच्या हातून सुटून मुक्त होऊ शकतील? म्हणूनच या गृहलक्ष्मीची पूजा व्हावी, त्यांच्यात ब्रह्मभाव विकसित व्हावा, या हेतूने मी हा मठ स्थापन करीन.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १ अश्विन (इषमास) शके १९४७*
★ अश्विन शुक्ल /शुध्द २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २३ सप्टेंबर २०२५ ★ १८७३ महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
★ १८५८ मराठा साम्राज्याचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँड डफ यांचा स्मृतिदिन.
★ १९३९ आधुनिक मानसशास्त्राचे जनक, आस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ सिंग्मड फ्राईड यांचा स्मृतिदिन.
★ १९५० महाराष्ट्रातील समाजसुधारक डॉ. अभय बंग यांचा जन्मदिन.
