
लासलगाव, दिनांक २२ सप्टेबर ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना + २ स्तर विभागाच्या वतीने 24 सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे औचित्य साधून दिनांक 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 हा राष्ट्रीय सेवा योजना आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून व्याख्यानमालेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प मराठी विभागाचे कवीवर्य प्रा.किशोर गोसावी यांनी गुंफले. त्यांनी ‘भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान’ या विषयावर रा.से.यो. स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अदिनाथ मोरे होते. तसेच मंचावर रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे व प्रा.सुनिल गायकर होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती माता आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमास वक्ते म्हणून लाभलेले कविवर्य प्रा.किशोरजी गोसावी यांनी भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान या विषयावर रा.से.यो. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थी जीवनात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या विचाराचे पाईक बनूया असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. शिवराज शर्मा या स्वयंसेवकाने केले, वक्ता परिचय कु. पूजा खैरे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन कु.अविनाश खरात या विद्यार्थ्याने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे व रा.से.यो. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सर्व रा.से.यो. स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

