
न्यायडोंगरी ( प्रतिनिधी ) कै शिवराम वेडूजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकनेते कै ॲड विजय शिवराम आहेर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज न्यायडोंगरी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान २०२४-२५ अंतर्गत विद्यालयास तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आज सोमवार दिनांक २२/०९/२०२५ वार सोमवार रोजी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान २०२४-२५ पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला.* नांदगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद चिंचोले व सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमांतर्गत विद्यालयास तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाले. याप्रसंगी पारितोषिक स्वीकारताना विद्यालयाच्या प्राचार्या सौ. पी. व्ही. आहेर मॅडम उपमुख्याध्यापक श्री. टी. ई. मवाळ सर, पर्यवेक्षक श्री. पी. एन. सोनेज सर तसेच संस्थेचे संचालक तथा विद्यालयाचे मुख्य लिपिक श्री. बाळासाहेब भोसले व इतर शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
