
साकोरा (प्रतिनिधी)आज 22 सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकोरा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती मोठ्या उत्साहात व श्रध्देने साजरी करण्यात आली.

विद्यालयाचे स्कूल कमिटीचे चेअरमन श्री रमेश उग्रसेन बोरसे, प्राचार्य श्री झाल्टे डी. एस., स्कूल कमिटीचे सदस्य, विद्यालयाचा सर्व स्टाफ, ग्रामस्थ व पालक यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. जयंतीनिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बँड पथकाच्या तालावर मिरवणुकीत गरबा नृत्य, लेझीम नृत्य सादर केले. तसेच ‘मोबाईल मुळे मुलांचे हरवले बालपण’ या विषयावरील नाटिका, विविध वेशभूषा धारण करून विविध समाजाची व समाजसुधारकांची ओळख विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत करून दिली. मिरवणुकी दरम्यान पावसाचे आगमन झाल्याने देखील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात घोषणा देत मिरवणुकीत आनंदाने सहभाग घेतला.

या मिरवणुकीच्या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी, पालक व स्थानिक मान्यवर उपस्थित होते. शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
