
विंचूर दि.२२(प्रतिनिधी, संदीप शिरसाट )शिक्षणाची गंगा बहुजनांच्या झोपडी पर्यंत पोहचविणारे आधुनिक भागीरथ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदिश जेऊघाले,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ.सुजित गुंजाळ व रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य सुनिल मालपाणी यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तद्नंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची सजविलेल्या रथातून ढोल ताशांच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत विद्यार्थ्यांनी लेझीम,झांज, ढोल, ताशा, आदीवासी नृत्य,पावरी नृत्य, टिपरी नृत्य, दांडीया नृत्य, पथनाट्य, आदींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज व मावळे, डॉ बाबासाहेब आंबेडकर, समाजसुधारक, जलव्यवस्थापन, गणितीय संशोधन, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन, रस्ते सुरक्षा,क्रांतिकारक, सर्वधर्मसमभाव, स्त्री-पुरुष समानता, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, वारकरी, साईबाबा, ग्रंथ दिंडी, दांडी यात्रा, वृक्ष दिंडी,भजनी मंडळ, सैनिकी देखावा, तंबाखू मुक्ती, साक्षरता,व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव, जागरण-गोंधळ आदी विषयांवर आधारित देखावे सादर करून सामाजिक जनजागृती केली. यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पंढरीनाथ दरेकर, अनिल दरेकर,प्राचार्य नंदकुमार देवढे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गोरे, उपाध्यक्ष सोमनाथ निकम उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे, पर्यवेक्षक सुदाम माळी, लाइफ मेंबर राजेंद्र चांदे, प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिरसाठ, पी.के. जेऊघाले, प्रविण ढवण, बागुल सर, विनायक जेऊघाले, राजाराम दरेकर, दिनकर चव्हाण, ज्ञानेश्वर गाडे, सोनाली कापडणीस, सोमनाथ दरेकर, राजेंद्र क्षीरसागर, कडू पाटील, सतिश शेलार, मुकुंद आभाळे, रविंद्र सानप, महेश जोशी, मधुकर दरेकर, महेंद्र म्हस्कर, भूषण चव्हाण, संजय जोशी, सुमनताई दरेकर, भागवत जाधव, विजय. शेवाळे, युवराज दरेकर, स्वाती धात्रक, मीरा दरेकर, स्नेहल साळी, आरती जाधव, वर्षा वाघ, मालती जाधव, आदींसह विद्यार्थी,पालक, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
