
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०३६ वा दिवस* मानवामध्ये जे काही शक्तिमान व शुभ असे दिसून येते ते त्या दिव्यत्वाचाच परिणाम होय. आणि हे दिव्यत्व बहुसंख्य लोकांत व्यक्त झालेले नसले तरी माणसामाणसांमध्ये मूलतः भेद नाही, कारण सगळ्यांचेच स्वरूप मूलतः दिव्य आहे. जणू काही एक अनंत महासागर आपणा सर्वांच्या मागे असून तुम्ही-आम्ही सर्वचजण त्याच्या पृष्ठभागावरील लाटा आहोत, आणि आपल्यापैकी प्रत्येकजण ते अनंत अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून स्वरूपतः प्रत्येकाचा त्या सच्चिदानंदरूपी महासागरावर जन्मसिद्ध अधिकार आहे; आणि आपल्यामध्ये जो भेद आहे तो त्या दिव्यत्वाची वा ईश्वरत्वाची अभिव्यक्ती करण्याच्या आपल्या कमीअधिक क्षमतेमुळेच निर्माण झालेला आहे. *स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर ३१ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ अश्विन शुक्ल /शुध्द १
★ शालिवाहन शके १९४७
शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५ ★ घटस्थापना, शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ
★ जागतिक कन्या दिन
★ १८८७ महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात बहुजनांसाठी शिक्षणांची सुविधा उपलब्ध करून देणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव (आण्णा) पाटील यांची जयंती.
★ १९२३ जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्मदिन.
★ १९९१ मराठी व हिंदी भाषा भाषेतील तीनशेहून अधिक चित्रपटात भूमिका करणारी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा स्मृतिदिन
.★ कर्मवीर आण्णांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
