
या कार्यक्रमाची सुरुवात भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
भाऊराव पाटील शिक्षणक्रांतीचे कर्मवीर हे आदर्श व्यक्तीमत्व होते. बहुजन समाजाला ज्ञानाची संजीवनी देणारे ते एक महान धन्वंतरी होते. गोरगरीबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणारे एक आधुनिक भगीरथ होते. अज्ञान, अंधश्रध्दा आणि जाती-धर्माने पहुडलेल्या समाजाला त्यांनी ज्ञानाचे अमृत पाजून त्यातून बाहेर काढले. संपुर्ण आयुष्य त्यांनी शिक्षणप्रसाराला वाहून दिले. तन मन धन त्यासाठी अर्पण केले. शिक्षणाबरोबरच स्वावलंबन शिकवले. श्रम शिक्षणातून स्वावलंबन, प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि आत्मविश्वास निर्माण करुन तरुणांना मुख्य प्रवाहात आणले. शिक्षणाची संधी मिळू न शिकणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवली

महाराष्ट्रात शिक्षणप्रसाराची एक अखंड चळवळ निर्माण केली. त्यासाठी त्यांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. कमवा आणि शिका सारखी उत्कृष्ट पध्दत सुरु करुन सर्वांना शिक्षण क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न केला.अशा महान कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन *या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे, विजय मुठे प्रकाश शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.**या कार्यक्रमाचे सुञसंचलन गणेश पाटील तर प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.व आभार प्रकाश शिरसाठ यांनी मानले* या प्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,गणेश पाटिल भीम आमीॅ चे प्रकाश शिरसाठ, लखन पाचोरे शाम डांगे, रमेश सालमुठे,बाळू पवार,अनिल लोणारे आकाश धोंगडे गजानन जाधव, सुरज खराडे आदी.उपस्थित होते
