
नाशिक ( प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कुसुमाग्रज अध्यासनातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त विद्यापीठ यांच्यासाठी सन 2024 सालातील मला आवडलेले पुस्तक या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत बहुविद्यशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या शैक्षणिक संयोजक डॉ.मंजुश्री श्रीपाद नेव्हल यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी “प्रेरणादायी प्रवास एका हिरोचा ” ओ.पी.मुंजाल यांच्या आयुष्यातून शिकण्यासारखे, या श्रीमती प्रिया कुमार लिखित व श्री.पराग पोतदार अनुवादित पुस्तकावर निबंध लिहिला होता स्पर्धेतील निबंधाचे परीक्षण प्रा. विजयकुमार पाईकराव यांनी केले.विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा.संजीव सोनवणे यांच्या हस्ते डॉ.नेव्हल यांचा डाॅ. तारा भवाळकर लिखित “सितायन” हे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी कुसुमाग्रज अध्यासनचे प्रमुख डॉ.दिलीप धोंडगे आणि निरंतर शिक्षण विद्याशाखाचे संचालक डॉ.जयदिप निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
