
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०३५ वा दिवस* सवय लावून घेणे किंवा सोडणे आपल्याच हाती असते. वाईट सवयी चांगल्या सवयींनी कह्यात आणता येतात. चांगल्या सवयी लवकर लागत नाही तर वाईट सवयी लवकर सुटत नाही. सतत सत्कृत्ये अत्यंत आवश्यक आहेत. काया-वाचा-मन यांचे पावित्र्य आवश्यक आहे. सत्य, त्याग आणि सेवा यांचे अधिष्ठान आपल्या ठायी हवे. दृढनिश्चय, धैर्य, चिकाटी या तीन गोष्टी असतील तर तुमच्यापैकी प्रत्येकजण अचाट कामे करतील. जेणेकरून आत्मविश्वासाने आपले संकल्प व आपल्या योजना कृतीत उतरवतील. यासाठी जीव ओतून, प्राणपणाने प्रयत्न करतील.
*स्वामी विवेकानंद…* ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
★ भारतीय सौर ३० भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद अमावस्या
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. २१ सप्टेंबर २०२५
★ पितृपक्ष सर्वपित्री अमावस्या
★ १९२९ शास्त्रीय गायक व संगीताचे अभ्यासक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्मदिन
★ १९८२ मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा स्मृतीदिन
★ संस्कार व शिक्षण जागृती दिन
.★ आंतरराष्ट्रीय शांतता दिन.
