
निगडोळ :-येथील रयत शिक्षण संस्थेच्या मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या ज्ञानसंकुलात रविवार दि.२१ सप्टेंबर २०२५ रोजी केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मुल्यमापन चाचणी FLNAT परीक्षा २०२५-२६ च्या उल्लास नवसाक्षर अभियानांतर्गत लेखी परीक्षा सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या केंद्रातच संपन्न झाली.एकूण ११ नवसाक्षर परीक्षार्थींनी परीक्षा दिली.मा.गटशिक्षणाधिकारी श्री.चंद्रकांत गवळी साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.कैलास पगार साहेब व केंद्रप्रमुख श्री.नितिन बागुल साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रसंचालक म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बोरसे डी.डी.यांनी काम पाहिले.जेष्ठ शिक्षक श्री.एन.जे.कापडणीस यांनी परीक्षेचे नियोजन केले.श्री.वाघमारे ए.बी.यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.श्री.बेद्रे एस.व्ही.व श्रीमती गायकवाड पी.व्ही.यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षेच्या आयोजन व नियोजनासाठी श्री.देवरे व्ही.ए.व श्री.भामरे टी.व्ही.यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.
